उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे उपक्रम
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रात धडक अंगणवाडी तपासणी मोहिमेंतर्गत तपासणी झालेल्या बालकांमधून कुपोषित बालकांसाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूण २८३ जणांच्या तपासणीतून ३४ बालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे संदर्भित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरी पुजनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य विभाग,महिला बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन पेड्रीटीयाटिक असोसिएशनचे सदर शिबिरास सहकार्य लाभले. डॉ.अमोल शेठ,डॉ.सतीश चौधरी, डॉ.संदीप पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.राहुल निकम या बालरोग तज्ज्ञांच्या मार्फत कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
समता फाउंडेशन मार्फत अतिरिक्त औषध पुरवठा करण्यात आला. शिबीर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.नरेश पाटील, डॉ.दानिश खान, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.चंद्रमणी सुरवाडे, डॉ.जितेंद्र वानखेडे, डॉ.धंनजय पाटील, डॉ.अनिता राठोड, डॉ.विजया पाटील, डॉ.स्वाती विसपुते, डॉ.निलेश चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील, संघमित्रा सोनार अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व राष्ट्रीय बाल स्वास्थ टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.