शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जळगाव शहर मनपा शिक्षण मंडळ कार्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना संदर्भात केंद्र प्रमुखांची आढावा सभा सोमवारी दि. २४ रोजी घेण्यात आली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक विजय पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
केंद्रातील सर्व शाळांनी पोषण योजनेची ऑनलाईन हजेरी नियमित भरावी, शाळांना भेटी देऊन स्वच्छता व योजनेच्या अंमलबजावणीबाबत पाहणी करावी, शहरातील शाळांना परसबाग उपक्रमबाबत प्रोत्साहित करावे अशा सूचना देण्यात आल्या. सभेला केंद्र प्रमुख गंगाराम फेगडे, सचिन बोरसे, ईश्वर पाटील, कुर्बान तडवी, अशोक सैंदाणे, राजेंद्र राजपूत, नईम शेख, समाधान सोनवणे उपस्थित होते. बैठकीला प्रशासन अधिकारी दीपाली पाटील, लिपिक गणेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.