पाचोरा :- तालुक्यातील बहुळा धरणाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंतांना आढळून आल्याची घटना दि. २० जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहराजवळील बहुळा धरणाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवार दि. २० जून रोजी सकाळच्या सुमारास मिळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हुसेन शहा यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांनी त्या अनोळखी इसमाचा मृतदे ह पाचोरा ग्रामीण रुग्णालय दाखल केला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन निकम, हरीश अहिरे हे करीत आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या याविषयी चर्चेला उधाण आले आहे, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर खरी माहिती समोर येणार आहे.