जळगाव;- शेती आणि शेतकऱ्यांशी बांधिलकी जपणारा अर्थसंकल्प म्हणता येईल. शेतकऱ्यांच्या कर्जेमुक्तीसाठी सुरू असलेले सकारात्मक प्रयत्न, शिवाय नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना आता ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऊर्जा देणारी ठरेल. शेतीला वीजपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेसह, पाणी बचतीच्यादृष्टीने ऊस पीक ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी अल्पभुधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष अनुदानाची योजना राबविण्याची तरतूद अर्थसंकल्पात दिसते.
– अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव