जळगाव ;- येथील धर्मरथ फाऊंडेशन’तर्फे जिल्हाधिकारी यांना शिवाजी नगर मधील म.न.पा. रुग्णालयातील मॅटरर्निटी होम (प्रसूतिगृह) पूर्ववत सुरू करणे संदर्भात निवेदन देण्यात आले.
प्रभागातील तथा शहरातील काही भागातील बर्याच गोर-गरीब महिला भगिणी शिवाजीनगर येथील म.न.पा रुग्णालयात प्रसुतीसाठी येत असतात,परंतु काही दिवसांपासून पासून येथील प्रसुती गृह काही कारण्स्तव बंद करण्यात आलेले आहे. आणि शिवाजीनगर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या बघता जवळपास एक लाख आहे,तसेच एवढ्या मोठ्या प्रभागांमध्ये महापालिकेचे हे एकमेव रुग्णालय आहे.या महापालिका रुग्णालयात फक्त प्रभागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातील काही महिला भगिनी सुद्धा प्रसुती करता येथे येत असतात.असे असताना देखील या लॉकडाउनच्या काळात मनपा रुग्णालयातील पुरेशा स्टाफच्या अभावी रुग्णालयातील प्रसूतिगृह बंद करण्यात आलेले आहे.त्यामुळे येथील महिला भगिनींना त्यांच्या प्रसूतीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करत खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.शिवाजी नगर मधील नगरसेवक नवनाथभाऊ दारकुंडे यांनी देखील यापुर्वी या विषयीचा पाठपुरावा करत जिल्हाअधिकारी साहेबांना निवेदन दिलेले होते. परंतु कुठलाही प्रतिसाद प्रशासन कडून न मिळाल्याने. तरी आता परत धर्मरथ फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हाअधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे कि आपण लवकरात लवकर या रुग्णालयाला स्टाफ पुरवून रुग्णालयातील मॅटर्निटी होम (प्रसुतीगृह) पूर्ववत सुरू करावे अशी विनंती ती सर्व शिवाजीनगर वासी यांच्यातर्फे धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाला केलेली आहे.
त्यावेळी धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, प्रकाश मुळीक, मिलिंद बडगुजर आणि शिवाजी नगरातील इतर नागरीक उपस्थित होते.