यावल तालुक्यातील सांगवी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील सांगवी बुद्रूक या गावात मुख्य चौकातील एका बंद टपरीच्या आडोशाला ७५ वर्षीय वृद्ध गावठी हातभट्टीची दारू प्लास्टिकची कॅन तसेच वेगवेगळ्या पन्यांमध्ये बांधून विक्री करताना आढळला. वृद्धाकडून तब्बल ३० लीटर गावठी हातभट्टीची दारू इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी बुद्रूक गावात मुख्य चौकात एका बंद टपरीच्या आडोशाला दशरथ नामदेव कोळी (वय ७५) हे ३५ लीटर कॅनमध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून बसले होते व काही पन्यांमध्येदेखील त्यांनी दारू भरलेली होती. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस नाईक किशोर परदेशी, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, अशोक बाविस्कर यांनी गावठी हातभट्टीची दारू तसेच इतर साहित्य जप्त केले.
संशयिताविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.