जळगाव ;- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, शालेय शिक्षण विभाग जळगाव, नेहरु युवा केंद्र, जळगांव, पतांजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगाव व जळगाव जिल्हा हौशी योगा असोसिएशन, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने २१ जून हा दिवस आंतररराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने शहरात सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी तसेच शहरातील शाळेतील विद्यार्थी शिक्षक सामान्य नागरीक उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम २१ जुन २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल सकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार २१ जुन २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात येणा-या आंतरराष्ट्रि योग दिनाच्या कार्यक्रमास जळगाव शहरातील तसेच तालुक्याच्या ठीकाणी आयोजित होणा-या कार्यक्रमा संबंधित तालुक्यातील स्वराज्य संस्था, सर्व शाळा महाविदयालये, प्रतिष्ठाणे, विविध संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. तसेच सर्व शाळा महाविदयालय व संस्थांनी आपल्या स्तरावर कार्यक्रमाचे आयोज करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.