• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झुमऍपद्वारे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याचे ऑनलाईन सक्षमीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – कोविड- १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्याचे ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण केले जात आहे. या ऑनलाईन उपक्रमात झुमच्या माध्यमातून ८०० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत १८ सत्र संपन्न झाले आहेत.

परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६ एप्रिल पासून हा उपक्रम राबविला जात असून यामध्ये राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, जेष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय सहायक व परिषदेतील सर्व अधिकारी झूमद्वारे या ऑनलाइन कार्यक्रमातील प्रत्येक सत्रात सहभागी होत आहे.
लीडरशिप फॉर इक्वीटी या संस्थेच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या व्यावसायिक विकास मंचाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक दिनकर पाटील, उपसंचालक विकास गरड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऑनलाइन सत्रात विद्यार्थ्यांसाठी लर्न फ्रॉम होम, टी.व्ही. रेडीओच्या माध्यमतून अध्ययन साहित्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययन नियोजन, ई- साहित्य निर्मिती याबाबत चर्चा करण्यात आली.

माइंड फुलनेस, मूल्यमापन व सनियंत्रण, ताणतणावाचे व्यवस्थापन, शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका, वेगवेगळ्या देशातील शैक्षणिक धोरणे व तेथील शैक्षणिक प्रयोग यावरही चर्चा झाली. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनीही शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली. मृणाल कुलकर्णी यांचे पालकत्व व मानसिक आरोग्य, अच्युत गोडबोले यांचे माझ्या लेखनामागची प्रेरणा तसेच महाराष्ट्रतील कवी व लेखक डॉ.विठ्ठल वाघ, डॉ.यशवंत पाटणे, इंद्रजीत भालेराव, सतीश सोळांकूरकर, दिनकर पाटील यांचे अधिकारी घडताना, डॉ.संजय मालपाणी यांचे शिक्षणातील पाच एस असे आजपर्यंत या उपक्रमांचे झूम द्वारे अनेक सत्र संपन्न झालेले आहेत. या सत्रांमध्ये राज्यातील प्रसिद्ध लेखक, विचारवंत, अधिकारी, शिक्षणतज्ञ, कलावंत इत्यादींनी आपला सहभाग नोंदवून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

दैनदिन कामकाजाबाबत नेहमी सकारात्मक राहून आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी, आपल्या कामाबाबतची दृष्टी बदलण्यासाठी ही सत्र अत्यंत उपयुक्त असल्याचे अनेक अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. अधिकाऱ्याचे ऑनलाईन सक्षमीकरण असा हा प्रयोग प्रथमताच आयोजित करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

राम नगरातून अज्ञात चोरटयांनी चार मोबाईल लांबवीले

Next Post

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी साधला संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon