यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथील ३५ वर्षीय तरुणाने शेतविहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दिनांक १० जून रोजी सकाळी घडली. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
समाधान बळीराम कोळी (वय ३५, चिंचोली ता.यावल) या तरुणाने सोमवारी चिंचोली गावाजवळ असलेल्या दीपक बडगुजर यांच्या शेतविहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात संदीप गोविंदा कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.