जळगांवात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : महावितरणच्या जळगांव परिमंडल आणि मंडलातही महावितरणचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी दि. ६ जून रोजी झालेल्या वर्धापन दिन समारंभात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात कार्मचारी-अधिकारी यांच्यासह त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात पावसाळी दिवसाची जाणिव ठेवून सुरळीत वीज पुरवठ्याची काळजी घेत जळगाव येथील एका सभागृहात झालेल्या समारंभात गुणवंत कामगारांच्या सन्मानांसह मुक्ताईनगर विभागाच्या वतीने ‘जनमित्र एक संघर्ष योध्दा’ हे नाटक सादर करण्यात आले. सोबतच संगीत, फ़िशपॉंड, बालनृत्याचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक मुख्य अभियंता कैलास हुमणे होते. महावितरणच्या प्रगतीचा आढावा घेत वीज ग्राहकांना केंद्रभागी ठेवून अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचे कर्मचाऱ्यांना हूमणे यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जळगावचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांनी केले. कार्यक्रमास पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज विश्वासे, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह कार्यकारी अभियंते, मानव संसाधन, वित्त व लेखा विभाग जनसंपर्क विभाग, औद्योगिक संबंध विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी-कर्मचारी, संयोजक समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार संघटनांचेही सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहाय्यक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.