जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांना भुरट्या चोरांचा त्रास
जळगाव (प्रतिनिधी) : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या शेतामधून तसेच कब्रस्थान येथून केबल वायर चोरी केल्याचे प्रकार घडले आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही अद्याप या घटनांना आळा बसला नसून चोरटे मोकाट आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाई करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे सविस्तर निवेदन पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तक्रारदारांचे शेतामध्ये तसेच मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट येथे केबल वायरची चोरी झाले आहे. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. मात्र कुठलीही कारवाई झालेली नाही.तरी आपण स्वतः त्यात लक्ष घालावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर ज्ञानेश्वर रमेश पाटील, लोटन गरबड बारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.