• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुटुंब गच्चीवर झोपलेले, चोरटयांनी संधी साधत रोकडसह नववधूचे दागिने लांबविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

बोदवड शहरात ११ लाखांची धाडसी घरफोडी

बोदवड (प्रतिनिधी) : येथील खाटिकवाड्यात कुटुंब झोपण्यासाठी गच्चीवर असताना चोरटयांनी घरात घुसून ११ लाखांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना मंगळवारी दि. २८ मे रोजी उघड झाली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील खाटीकवाड्यात शेतकरी व अंडापाव विक्रेते विलास सीताराम फाटे कुटूंबासह राहतात. उन्हाळ्यामुळे सर्व कुटूंबातील सदस्य सोमवारी रात्री गच्चीवर झोपले होते. ही संधी चोरट्यांनी साधत वरच्या मजल्याच्या दरवाजाला कडी लावून काम फत्ते केले. मंगळवारी पहाटे चार वाजता कुटूंबातील महिलेला जाग आल्यानंतर गच्चीचा दरवाजा उघडत असताना तो लॉक असल्याचे लक्षात आले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.

फाटे या शेतकर्‍याने घरात ९० क्विंटल कापूस भाववाढीच्या आशेने साठवला. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी कापसाची विक्री केली व त्यातून आलेले ५ लाख २० हजार व अंडा-पाव विक्रीच्या व्यवसायातील ८० हजार मिळून त्यांनी ६ लाख रुपये लाकडी कपाटात ठेवले होते. दि. ५ मे रोजी मुलगा प्रतीकचे लग्न झाल्यानंतर सुनेचे १४ तोळ्याचे दागिनेही कपाटात ठेवल्याने मोठी संधीच चोरट्यांना उपलब्ध झाली. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फाटे कुटूंबाच्या घरात प्रवेश केला. आधी कुटूंब गच्चीवर गाढ झोपेत असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी गच्चीचा दरवाजा आतून बंद केला.

त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सर्व ११ लाख ५ हजारांचा ऐवज लांबवला. मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह अधिकार्‍यांनी भेट दिली. तसेच जळगाव पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.  मात्र श्वान जागेवरच घुटमळले. बोदवड पोलिसात विलास फाटे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दुसर्‍या घटनेत शहरातील उजनी रस्त्यावरील विजय बडगुजर यांच्या शेतात महादेव मंदिरात असलेला पंचधातुचा अकरा किलो वजनाचा नाग ही चोरीला गेल्याचे दिसून आले आहे.


 

 

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोरट्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण, शेतातील ठिबक नळ्या नेल्या चोरून !

Next Post

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026
बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
1xbet russia

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon