चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची एलसीबीच्या मदतीने कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एलसीबीच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन १२ मोबाईल जप्त करण्यात आले असून हे मोबाईल मूळ मालकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवारी दि
२५ मे रोजी दुपारी परत देण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मूळ मालकांना अंदाजे २ लाख १० हजार रुपयांचे मोबाईल परत देण्यात आले आहेत. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील, पो. कॉ. शरद पाटील, नरेंद्र चौधरी, मनोज तडवी, सचिन सोनवणे, ईश्वर पाटील, गौरव पाटील आदींनी याबाबत कारवाई केली आहे.