एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव : हातात लोखंडी सुरा घेवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई करत सुरा जप्त केला. ही कारवाई रविवार, १९ मे रोजी रात्री तांबापुरा भागातील मच्छी बाजार परिसरात करण्यात आली.
विशाल संतोष भोई (२८, रा. तांबापुरा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोमवार, २० मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांबापुरा परिसरात विशाल भोई हा लोखंडी सुरा हातात घेवून दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस कर्मचारी मच्छीबाजार परिसरात पोहचले. तेथे विशाल भोई याच्यावर कारवाई करत लोखंडी सुरा जप्त केला.
याप्रकरणी पोकॉ विनोद ऑस्कर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल भोई याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.