नेरी ;– महाराष्ट्राचे लोकनेते मा .जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आ .गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिम्मित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरी दिगर येथे जी एम फौंडेशन व ग्राम पंचायत नेरी दिगर यांच्या विद्यमाने डॉ नरेश पाटील यांच्या सहकार्याने गावातील लोकाची घरोघरी जाऊन थर्मास्कन्नरच्या यंत्राद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली.
नेरी येथे महाराष्ट्राचे आरोग्यदूत आ.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यदूत पितांबर भावसार यांच्या पुढाकाराने जी एम फौंडेशन व ग्रा.प .नेरी दिगर, तर्फे गरिब व गरजू लोकांना , आरोग्य कर्मचारी आशासेविका , ग्रा.प.कर्मचारी , सफाई कर्मचारी , पोलिस अधिकारी यांना सॅनिटायझर व मास्क व रोग प्रतिबंधक आयुर्वेद गोळ्या मोफत वाटप करण्यात आले ,
यावेळी सरपंच गोटु पाटील ,डॉ नरेश पाटील , ग्रामविकास अधिकारी दिपक शिंदे , जग्गनाथ झांबरे , अनिल पाटील , रवी बाविस्कर , दिपक गोडवे , उपस्थित होते , उपक्रम यशस्वीतेसाठी आरोग्यदूत पितांबर भावसार,प्रदीप चोपडे आरोग्यसेवक , आशा सेविका यानी परिश्रम घेतले .







