• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेन्शनच्या रकमेसाठी मुलानेच केला ९० वर्षीय आईचा खून,

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2024
in जळगाव
0
पेन्शनच्या रकमेसाठी मुलानेच केला ९० वर्षीय आईचा खून,

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील हत्याप्रकरणाचा उलगडा !

एलसीबीच्या पथकाला ५ दिवसानंतर यश

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वाकडी येथे शनिवारी दि. ११ मे रोजी एका ९० वर्ष वृद्ध महिलेचा राहत्या घरात मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, ही घटना अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी झाली असावी असे चित्र दिसून येत होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अर्थात एलसीबीच्या पथकाने कसून तपास करीत अखेर पाच दिवसानंतर यश मिळविले आहे. ९० वर्षीय आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेपोटी मुलाने तिला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासामध्ये स्पष्ट दिसून आले आहे. मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

राधाबाई भालचंद परदेशी (वय ९०, रा. वाकडी ता. जामनेर) असे मयत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. गावात त्या एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) हे परिवारासह राहतात. तर दोन मुलींची लग्न झालेली आहेत. शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून त्या ११ ते सव्वा ११ वाजेच्या सुमारास निघून त्यांच्या घरी गेल्या होत्या. नंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला होता. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला होता.

या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनसह एलसीबीचे पथक तपासासाठी कामाला लागले होते. त्यांनी घटनेप्रकरणी एकेक धागा जोडून त्याचा तपास केला. मात्र तपास लागत नव्हता. अखेर पाच दिवसानंतर एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाला यश आले. त्यांनी मयत राधाबाई यांचा मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी (वय ६५, रा. वाकडी ता. जामनेर) यालाच अटक केली. त्याला याबाबत जाब विचारला असता त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुभाष परदेशी याचे वडील अर्थात मयत राधाबाई यांचे पती भालचंद्र परदेशी हे शिक्षक होते.

निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन सुरू होती. भालचंद्र परदेशी हे वारल्यानंतर ती पेन्शन राधाबाई यांना सुरू होती. दरवेळेला एकत्र तीन महिन्याची पेन्शन घेण्यासाठी राधाबाई यांच्यासोबत मुलगा सुभाष हा जायचा. पेन्शनच्या रकमेमधून चार पाच हजार रुपये आई राधाबाई हिला देऊन बाकीचे सुभाष हाच ठेवून घ्यायचा. आता मात्र राधाबाईने पेन्शन घ्यायला स्वतः जायचा निर्णय घेतला व सुभाषला सोबत येण्यास नकार दिला होता. यामुळे सुभाषला आईच्या वागण्याचा राग आला होता.

त्या वागण्यातून शनिवारी त्याने आईसोबत वाद घातला आणि आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत आई राधाबाई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुभाष हा लगेच त्याच्या घरी निघून गेला. ५ दिवस तो पोलीस तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. मात्र गावातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि नेहमी तो आईला त्रास दियाचा यामुळे सुभाष परदेशी याच्या वर्तनावरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच खुनाची घटना उलगडली. तपास कामी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सपोनि गणेश फड, पोउनि गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, पोह महेश महाजन, लक्ष्मण पाटील, अकरम शेख, किशोर राठोड, विजय पाटील, रणजित जाधव, सचिन महाजन, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकुर, अभिलाषा मनोरे, मंगला तायडे सर्व नेम. स्थागुशा जळगाव, पोह विनोद पाटील, मुकेश पाटील नेम. फत्तेपुर परिश्रम घेतले.

 


 

 

Previous Post

भरधाव ट्रकने दुचाकीला दिली भीषण धडक : महिलेचा मृत्यू,पतीसह दोघे जखमी

Next Post

जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू

जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon