जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी संपूर्ण परिवारासह रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले. यावेळी गोदावरी फौंडेशनच्या गोदावरी पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मतदान करून देश सेवेच्या कार्यात सहभागी होण्याची ही संधी असून जनतेनेही मतदान करावे असे आवाहन डॉ. केतकी पाटील यांनी केले.