गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली शपथ
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी भागवत यांनी केलेल्या सूचना व आवाहनास प्रतिसाद देत आज गुरुवार दि.९ मे रोजी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व १८ मार्केटचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांना दि.१३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार जनजागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन केले.
सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकुटुंब मतदान करण्याची शपथ डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली. यावेळी संघटनेचे राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ, पंकज मोमाया, वसीम काझी, केशव नारखेडे, रिजवान जागीरदार, सुरेश पाटील, सुनील गगडाणी, भूषण देपुरा, शिरीष थोरात, नितीन सोनवणे, भास्कर वाघोदे, अजय बडगुजर, मनोज पाटील, शेरा सोनवणे, आशिष ठाकरे, महेंद्र सोनवणे, संजय मराठे, पंढरी कोळी, मनोज चव्हाण, शंकर सोनवणे, अनिल देशमुख, विनोद वानखेडे व मोठ्या संख्येने गाळेधारक बंधू उपस्थित होते.