जळगावच्या पांडे चौकातून झाली होती चोरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पांडे डेअरी चौकातील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या परिसरात लावलेली दुचाकी चोरीप्रकरणी एका संशयित चोरट्यास एमआयडीसी पोलिसानी तपास करून अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
शहरात दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी राहुल संजय वाघ (रा. जयजवान चौक, मेहरूण, जळगाव) हा त्याची दुचाकी एमएच १९ डीएल १५९४ ही पांडे चौकातील पोस्ट कार्यालयाच्या गेट बाहेर लावून पोस्टातील काम करण्यासाठी गेले. काम आटोपून परतले असता त्यांना त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. म्हणुन त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल होता. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली.
संशयीत आरोपी महेश राजेश गायकवाड (वय- २०, रा. मेहरुण, रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा संशयीतरित्या एक मोटर सायकल रामेश्वर कॉलनी येथे घेऊन फिरत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सदर संशयिताला ताब्यात घेतले. सदर पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मदतीने तपास केला. सदर संशयितांकडे गुन्हयातील दुचाकी वाहन मिळुन आले. त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या कडुन सदर गुन्हयातील चोरी झालेली दुचाकी ताब्यात घेण्यात आली. पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकों गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, सचिन पाटील, पोकों विनोद आस्कार, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील अशांनी कारवाई केली आहे. संशयितांकडून जप्त दुचाकी हस्तगत करुन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पेठ पोस्टे यांचे ताब्यात देण्यात आली आहे.









