नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील तीन दिवसात दिली. आज पुन्हा अर्थमंत्र्यांनी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले.
ANI
✔
@ANI
Online education during COVID19: Swayam Prabha DTH channels launched to support and reach those who do not have access to the internet; now 12 channels to be added: FM Nirmala Sitharaman
View image on Twitter
289
11:36 AM – May 17, 2020
Twitter Ads info and privacy
76 people are talking about this
डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करण्यात येणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदा होईल असे सीतारमन यांनी सांगितले.
चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.