भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे परिसरमध्ये असलेले रेल्वे म्युझियम नागरिकांसाठी साठी खुले करण्यात आले असून त्यात रेल्वेच्या जुन्या काळात वापरण्यात येणारे उपकरणे, जुने वाफेवर चालणारे इंजिन, प्रवाशांना बसायचा छोट्या गाडीचा डबा, जुनी सिग्नल यंत्रणाही जुन्या काळातील बघता येत आहे.
मोठे व लहान मुलांसाठी गेम्स, विविध प्रकारची खाण्याचे पदार्थ याचीसुद्धा व्यवस्था केली गेली आहे. छोटी गाड़ी ही महत्वाचे आकर्षण असणार आहे. यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येऊन खाण्याचे पदार्थचे बिल आपण जसे घ्याल त्याप्रमाणे राहील. ही रेल म्यूझियम नागरिकांसाठी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत खुले राहील. सुटीच्या काळामध्ये लहान मुलांना यांचा आनंद घेता येईल आणि जुन्या काळातली रेल्वेबद्दलची माहिती भेटेल, अशी माहिती जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली आहे.