अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील न्यायालयाच्या आवारातून एका व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, रहिम रमजान तेली (वय ४८) रा. गांधी नगर, अमळनेर हे आपल्या परिवारासह राहायला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अमळनेर न्यायालयात दुचाकी क्रमांक (एमएच १० क्यू ४९५१) ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी न्यायालयाच्या आवारात पार्कींग करून लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.