• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शाळेच्या बांधकामातही मागितली टक्केवारी, ग्रामसेवकास दोन लाखांची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शाळेच्या बांधकामातही मागितली टक्केवारी, ग्रामसेवकास दोन लाखांची लाच घेताना अटक

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

धुळे (प्रतिनिधी) : साक्री तालुक्यातील म्हसदी (प्र. नेर) या गावात उर्दू शाळेच्या विकास कामासाठी निधीची मंजुरी मिळण्याकरिता लागणाऱ्या खर्चात २० टक्के कमिशन मागणाऱ्या व त्यात २ लाख रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

तक्रारदार हे मौजे म्हसदी (प्र. नेर) येथील रहिवासी आहेत तर त्यांच्या पत्नी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. तक्रारदाराच्या पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वॉर्डात विकासकामे मंजूर होण्याकरीता त्यांच्या पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांना वेळोवेळी भेटुन पाठपुरावा करीत होते. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेत त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वॉर्डातील उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला मुलींकरीता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळणेकरीता अर्ज दिला होता. यावेळी  ग्रामसेवक बोरसे यांनी अंदाजे १२ लाखांच्या कामासाठी सुमारे २० टक्के प्रमाणे २ लाख ४० हजार रुपये काम घेणार्‍या इच्छूक ठेकेदाराकडून आगावू कमिशन मागितले होते.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २० फेब्रुवारी रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पडताळणी ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी दोन लाखांची लाच मागून ५० हजारांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. गुरुवार, २५ रोजी सापळा रचल्यानंतर ग्रामसेवक बोरसे यांनी म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायत कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.


 

 

Tags: #dhule crime news #maharashtrahttps://kesariraj.com/shalechya-badhkamatahi-takkevari/
Previous Post

भडगावात दुमदुमला मशालचा नारा; करण पाटलांच्या प्रचार फेर्‍यांना प्रतिसाद

Next Post

महिला प्रवाशांच्या पर्समधून सव्वा सहा लाखांचे दागिने लांबविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोरट्यांची तर आता हद्दच, पोलीस स्टेशनजवळच महिलेची पर्स लांबवली !

महिला प्रवाशांच्या पर्समधून सव्वा सहा लाखांचे दागिने लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon