भडगाव (प्रतिनिधी ) : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी आजपासून भडगाव तालुक्यात प्रचार फेर्या सुरू झाल्या असून याला ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराची पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील प्रचाराची धुरा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सांभाळली आहे. तीन दिवस पाचोरा तालुक्यात प्रचार फेर्या काढल्यानंतर आज भडगाव तालुक्यात प्रचार सुरू झाला आहे. आज सकाळी तालुक्यातील कनाशी, बोदर्डे, निंभोरा आणि कोठली या गावांमधून प्रचार फेर्या काढण्यात आल्या.
यात कनाशी येथून आज प्रचाराची सुरूवात करण्यात आली. प्रारंभी श्री चक्रधर देवस्थानाला भेट देऊन आशीर्वाद घेतल्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. यानंतर गावात प्रचारास प्रारंभ झाला. याप्रसंगी एकच वादा-करण दादा, एकच निशाणी मशाल अशा जयघोषाने परिसर दुमदुमल्याचे दिसून आले. तर, वैशालीताई सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्यांनी गावातील प्रत्येक ग्रामस्थाशी संवाद साधत त्यांना मशाल निशाणीला कौल देण्याचे आवाहन केले. यात खास करून ज्येष्ठ स्त्री-पुरूषांना वैशालीताईंनी आत्मीयतेने संवाद साधतांना परिवर्तनाचे आवाहन केले.
आजच्या प्रचार फेरीत कनाशी येथून अरूण धनराज पाटील व बालचंद्र त्र्यंबक पाटील यांच्यासह सहकारी सहभागी झाले. यासोबत, निंभोरा येथील साहेबराव शंकर पाटील, बाबाजी लक्ष्मण पाटील, गोरखनाथ नारायण पाटील आणि त्यांच्या सहकार्यांसी सहभाग घेतला.
दरम्यान, या प्रचार फेर्यांमध्ये शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह गणेश परदेशी, शंकर मारवाडी, जे. के. पाटील, शरद पाटील, दीपक पाटील, पप्पू पाटील, हरीभाऊ पाटील, योजनाताई पाटील, रीना पाटील, पुष्पाताई परदेशी, सविता चौधरी, उषाताई परदेशी, राकेश सोनवणे, माधव जगताप, चेतन पाटील, विजय साळुंखे, भूषण देवरे, संकेत सोमवंशी, जिभू महाजन, दत्तू मांडोळे, रामकृष्ण पाटील ( पप्पूदादा); राजेंद्र मोरे, अभिषेक खंडेलवाल, श्री गांगुर्डे आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.