जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, अधिपरिचारक तुषार पाटील, निलेश बारी, बी. एस. पाटील, प्रदीप पाडवी, पूजा भुसे, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.