जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविदयालयाची औदयोगिक अभ्यास मेटीचे आयोजन जळगाव येथील सुप्रसिद्ध रेमंड प्रा. लि. या औदयोगिक संस्थेत करण्यात आले.
विद्यार्थिनीनी व प्राध्यापकांनी रेमंड येथील प्लाटचे अवलोकन व परीक्षण केले, विद्यार्थिनीनी तांत्रिक कर्मचारी व व्यवस्थापकांशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निराकारन केले. या औदयोगिक संस्थेचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. योगिता घोंगडे, प्रा. मिताली शिंदे, प्रा.तेजल पाटील, विद्याधर इंगले सर उपस्थित होते.