जळगाव तालुक्यात मध्यरात्रीची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हि घटना मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
निलेश गणेश सावंदे (वय ३१, रा. चिंचोली ता. यावल ह. मु. तुरखेडा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो तुरखेडा येथे वीटभट्टीवर मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. सोमवारी दि २५ रोजी रात्री तो चिंचोली येथे घरी गेला होता. तेथून तुरखेडा येथे मित्र प्रदीप भगवान पंडित (वय २९) यांच्यासह परतत होता. नशिराबाद उड्डाणपुलाजवळ आले असतानां त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता निलेश सावंदे याला वैद्यकीय पथकाने तपासून मृत घोषित केले. तर प्रदीप पंडित याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.