जामनेर पोलीस स्टेशनची कामगिरी
जामनेर (प्रतिनिधी) : येथील जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत गावठी हातभट्टीधारकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात वाडी व गोंडखेल शिवारात ७ ठिकाणी कारवाई करण्यात आली.
निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात जामनेर पोलीस स्टेशन मधील पथक यांनी शुक्रवारी २२ रोजी जामनेर तालुक्यातील गावठी दारू भट्टी धारकांवर सर्वात मोठी कारवाई केली. जामनेर तालुक्यातील महूखेडा शिवारातील संजय भिल यांच्याकडून ८०० लिटर रसायन व ३५ लिटर पक्की गावठी दारू व भास्कर देविदास भिल, वाडी यांच्याकडून ४०० लिटर गावठी दारू रसायन हस्तगत केले. तसेच पंचफुला युवराज भील रा. वाडी याच्याकडून ३०० लिटर, बनाबाई अभिमान भिल यांच्याकडून ४०० लिटर गावठी दारू हस्तगत करून नष्ट करण्यात आले.
तसेच गोंडखेल शिवारातील युवराज दगडू जाधव यांच्या शेतात गावठी हातभट्टी ८०० लिटर रसायन हस्तगत करण्यात आले. युवराज जाधव व देविदास विठ्ठल कोळी यांच्यावर कारवाई करण्यात आली. गोंडखेल शिवारातील देविदास आनंदा कोळी व रामा कौतिक कोळी यांच्याकडून देखील ८०० लिटर रसायन हस्तगत करण्यात आले व नष्ट करण्यात आले. एकाच दिवसात जामनेर पोलिसांनी सात कारवाया करून १ लाख ९८ हजार ५०० किमतीचा गावठी हातभट्टीचा मुद्यमाल नष्ट करण्यात आला.
वरील कारवाई जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, चंद्रकांत दवंगे, सुनील जोशी, मुकुंद पाटील, राजू तायडे, चंद्रशेखर नाईक, तृप्ती नन्नवरे, निलेश घुगे, तुषार पाटील, ज्ञानेश्वर देशमुख, सोना सिंह डोभाळ, महेंद्र राठोड, योगेश पाटील यांनी केली.