पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वचक बसावे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जामनेर तालुक्यातील चौघांना हद्दपार केले आहे. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत त्यांचा सामाजिक उपद्रव निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन १ वर्षांकरिता हददपार करण्यात आले आहे.
पहुर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव प्रमाणे गुन्हेगार प्रदीप रामदास पाटील (वय २४, रा. पहुर पेठ ता. जामनेर) हा टोळी प्रमुख, शहारुख बनेखा तडवी (वय २३, रा. शिवनगर, पहुर पेठ, ता. जामनेर), इरफान लालखा तडवी (वय २३ रा शिवनगर पहुर पेठ ता जामनेर),शेख राज शेख समद (वय २४ रा. ख्वॉजा नगर, पहूर पेठ ता जामनेर) हे ३ टोळी सदस्य यांच्याविरुध्द पहुर पोलीस स्टेशनला जबरी चोरी, चोरी असे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी धनंजय येरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग यांनी केलेली आहे.
सदरचा हद्दपार प्रस्ताव हा पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, सफौ रविन्द्र देशमुख, पोहेको जिजाबराव कोकणे, पोना/ ज्ञानेश्वर ढाकरे, पोकॉ विकास गायकवाड, पोकॉ गोपाळ गायकवाड अशांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता. डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती गुन्हेगारांना ०१ वर्षा करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकांज पो. निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ यूनुस शंख इब्राहिम, पोहेको सुनिल पंडीत दामोदरं यांनी पाहिले आहे.