बचतगटाच्या महिलांना धमक्या, अॅड. रोहिणी खडसे यांचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिलांना धमक्या देऊन सभेला येण्यासाठी जबरदस्ती केली गेल्याचा धक्कादायक आरोप अॅड. रोहिणी खडसे यांनी केला आहे. सभेला न आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबत देखील धाक दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दि. ५ रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर दौऱ्यावर होते. दौऱ्यातील विविध कार्यक्रमासाठी उपस्थिती देण्याकरिता काही महिला बचत गटाच्या महिलांना सांगण्यात आले. मात्र उपस्थिती नाही दिली तर ५० रुपये दंड करू तसेच बचतगटातून काढूनही टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याची माहिती अॅड. रोहिणी खडसे यांनी दिली आहे. जर मुख्मयमंत्र्यांच्या सभेसाठी महिला वर्गाला धमक्या मिळत असतील तर हि बाब धक्कादायक आहे. यामुळे सत्ताधारी प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. अॅड. खडसे यांच्याकडे स्क्रीनशॉट व रेकॉर्डिंगदेखील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी महिलांना धमक्या देणे हा प्रकार गंभीर आहे.