चाळीसगाव शहरात केली होती चोरी
जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात ३ वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. त्याला अटक अटक करून चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहर पो.स्टे. मधील चोरीप्रकरणात पाहीजे असलेला संशयित आरोपी जगदिश बाळु शेळके (वय २३, रा. पथराड, ता. भडगाव) हा पथराड गावी येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. २५ रोजी पथराड येथून शिताफीने संशयित जगदीश याला पकडण्यात आले. त्याला पुढील कायदेशीर कारवाई करीता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, यांचे मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोउनि गणेश चौभे, विजयसिग पाटील, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, किरण चोधरी, सुधाकर अंभोरे, पोको राहुल पाटील अशा पथकाने कामगीरी केली.