ग्रामीण पोलिसांची कामगिरी, काडतूस-रोकडही जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यात गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुणे येथील तिघा संशयित आरोपीना चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या पोलीसाना गोपनीय माहिती मिळाली. सत्रासेनमार्गे दि. २३ रोजी रात्री २ वाजता एक राखाडी रंगाची एरटीगा कार (क्र. एम एच १२.आर एफ १४९६) मधून तीन इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन निघाले होते. रात्रगस्तचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून बुधगाव येथे थांबून थोडयाच वेळात सदर कार आल्याने कारची झडती घेतली. त्यात विनापरवाना ०३ गावठी कट्टे, ०८ जिवंत काडतुस व ८,४२,५००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला.
यात संशयित आरोपी जफर रहीम शेख (वय ३३ रा. भाजी बाजार, घोड नदी ता. शिरुर जि पुणे), तबरेज ताहीर शेख (वय २९ वर्षे रा. सेंटर दवाखाना समोर रिव्हेलीन कॉलनी ता. शिरुर जि. पुणे), कलीम अब्दुल रेहमान सय्यद (वय ३४, रा. पुणे) यांना अटक करण्यात आली असून यांचेवर चोपडा ग्रामीण पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई चोपडा ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधिकारी कावेरी कमलाकर, पो.ना. शशिकांत पारधी, चालक पो.हे.का. किरण आसाराम धनगर, स.फौ. राजु महाजन, सफो देवीदास ईशी, पोकों प्रमोद पारची, पोकों मनीष गावीत, पोकों विनोद पवार, पोकों मंहेद्र भिल, पोकों सदिप निळे, होमगार्ड श्रावण तेली, संजय चौधरी यांनी केली आहे.