जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी करणाऱ्यास जिल्हा पेठ पोलीसांनी बी.जे. मार्केट परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-४३, रा. हिरा शिवा कॉलनी, जळगाव) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शेख जाफर शेख अनवर रा. पिंप्राळा हे त्यांची दुचाकीने(एमएच १९ बीए ७६१२) ने २८ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेली होती. दरम्यान याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचा गुन्ह्याच्या शोध घेत असताना सीसीटीव्ही आणि गोपनिय माहितीच्या आधारे ही दुचाकी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी, जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, मिलिंद सोनवणे यांनी कारवाई करत गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याला बी.जे. मार्केट परिसरातून अटक केली. त्याने चोरी केलेल्या एकुण तीन दुचाकी काढून दिल्या. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे हे करीत आहे.