मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून एका तरुणाला जळगाव दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिश दाखवण्यात आले. करिता तरुणाकडून वेळोवेळी साडेतेरा लाखांत गंडवल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फकिरा अर्जुन सावकारे (वय-२५रा. भोकरी ता. मुक्ताईनगर) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांनी बारावी नंतर फिटर कोर्स केलेला आहे. नोकरीच्या शोधात असतांना त्यांची प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव) सोबत ओळख झाली होती. त्यावेळी प्रमोद सावदेकरने फकीरा सावकारे यांना सांगितले की, माझी राजकिय लोकांशी ओळख आहे व मी सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलय जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तुमचे नोकरीचे काम करायचे असल्यास तुम्हाला मी जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखविले.
त्यानंतर शेख जावेद शेख रहीम या मित्रासमोर दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी सावदेकर यांना ५ लाख रोख दिले. त्यानंतर काही कालावधी नंतर सावदेकर यांनी दुध फेडरेशन जळगाव येथे जागा निघाल्या असुन तेथे फॉर्म भरुन दे, मी पेपरचे पाहुन घेईल, असे फकीरा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी जळगाव दुध फेडरेशन येथे पेपर दिला व परीक्षेत पास झाले. यानंतर कन्फर्म ऑर्डर काढण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सावदेकर यांना पुन्हा दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव येथे ५ लाख दिले.
तेव्हा सावदेकर म्हणाले की, आता तुझी मुलाखत व कागदपत्रे पडताळणी होईल. त्यासाठी तुला परत साडेतीन लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मार्च २०२२ या महीन्यात त्यांना पुन्हा साडेतीन लाख दिलेत. परंतू पैसे घेऊन ऑर्डरसाठी फकीरा यांनी विचारणा केली असता सावदेकर यांनी उडवा उडवीचे उत्तरे द्यायला लागले. फकिरा सावकारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रमोद सावदेकर यांनी त्यांचे राजकीय हिससंबंध चांगले असल्याचा विश्वास देत आपली १३ लाख ५० हजार रोख घेवुन नोकरी न लावता फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादवी ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.