जळगाव : आज सर्वत्र कोरोना या आजाराने थैमान घातले असून शासन स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या उपाय योजना राबविल्या जाता आहेत. त्यातच लग्न समांरभ पण उरकले जाता आहेत. जळगाव तालुक्यातील रिधुर येथे ही काही लग्नाचे आयोजन होणार यामुळे कुठलीही प्रकारे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होऊन नियमभंग होणार नाही, या साठी ग्रामपंचायती मार्फत लग्न सभांरभ आयोजकांना ग्रामपंचायती बोलवुन सुचना देण्यात आल्या. गर्दी नसावी, सर्वांनी मास्क वापरावे, स्वच्छता पाळावी, व्यक्ती व्यक्तींमध्ये अंतर असावे, हात धुण्याची व्यवस्था करावी अशा सुचना देण्यात आल्या. या प्रसंगी ग्रामसेविका स्वाती पाटील, सरपंच रजना पाटील, पोलीस पाटील प्रमोद पाटील, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर आदी उपस्थित होते.