रावेर (प्रतीनिधी) :- धामोडी गावातील रहिवासी दुर्गादास पाटील यांची रावेर तालुका भाजपा सरचिटणीस पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. धामोडी गावातून राजकारणाला सुरुवात करीत कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे दुर्गादास पाटील सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्व आहे.
दुर्गादास पाटील यांचा सर्व साधारण कार्यकर्त्यापासून सुरु झालेला प्रवास त्यांची जनतेशी असलेली नाळ, गावखेड्यात संपर्क, सर्वाना आपलंसं करणार मन, गावापासून ते मंत्रालयापर्यंत संपर्क भाजपा सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. दुर्गादास पाटील यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले.