भडगाव येथील जुवार्डी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- नातवांच्या प्रेमापोटी व मुलाच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापास मुलाच्या सासरच्या मंडळींनी अपमानित केले. या त्रासाला कंटाळून जुवार्डी येथील भीमराव पाटील यांनी विषारी औषधप्राशन करत आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जुवार्डी येथे हि घटना घडली आहे.
भीमराव पाटील (वय ६६) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांचा मुलगा योगेश पाटील हे मुंबई येथील पोलीस दलात उपनिरीक्षक पदी कार्यरत आहे. योगेश पाटील यांना माहिती मिळाली की, घराचे छतावर काहितरी विषारी पदार्थ सेवन केल्याने भीमराव पाटील बेशुध्द अवस्थेत पडलेले आहेत, तेव्हा पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील लागलीच मुंबई येथुन रेल्वेने निघुन जुवार्डी येथे पोहचले, सदरच्या काळात दोन्ही भावांना त्यांनी याबाबत माहिती दिल्याने दोघेही भाऊ जुवार्डी येथे पोहचले होते. तेव्हा त्यांनी घटनेबाबत भडगाव पोलिसांना माहिती दिली.
भडगाव पोलीस जुवार्डी येथील घटनास्थळी दाखल झाले, त्या वेळेस मयत भीमराव पाटील यांचे खिशात त्यांच्या हस्ताक्षरात वहिच्या पानावर लिहिलेल्या दोन चिठ्या पोलीसांसमक्ष मिळुन आल्या. त्यामध्ये मयत भिमराव पाटील यांनी लिहिले आहे की, मी गोटु पाटील, संगिता पाटील यांना भेटलो. माझ्या मुलाचा संसार मोडु नका अशा विनवण्या केल्या. परंतु त्यांनी मला धक्के मारुन बाहेर काढुन दिले. त्यामुळेच अपमानित झाल्याने त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला असल्याची फिर्याद महेश भीमराव पाटील यांचा मुलगा मुंबई पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांनी भडगाव पोलिसात दि. ३ जानेवारी रोजी दिलेली आहे.
यावरून योगेश पाटील यांनी, पत्नी छाया योगेश पाटील, सासरे गोटू पाटील, सासू संगीता पाटील, शालक किरणकुमार पाटील, शालक शशिकांत पाटील यांनी नियमित अपमानीत केल्याने यांचे त्रासाला कंटाळुन माझे वडिल भिमराव पाटील यांनी फोस्किल मोनोक्रोटोफॉस नावाचे विषारी औषध प्राषन करुन मरण पावले, असे म्हटले आहे. त्यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलिसात संशयित सासरच्या पाचही जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यातील संशयित १ संशयित अटकेत तर ४ फरार असल्याची माहिती आज दि. ४ जानेवारी गुरुवार रोजी हाती आली आहे. तपास भडगाव पोलीस एपीआय चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.