जिल्हाधिकारी यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील भडगाव येथील वाळू तस्कारी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी २ डिसेंबर रोजी दिले आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेत रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी भडगाव पोलीस कर्मचारी नागपूर येथे रवाना झाले.
संजय सुरेश त्रिभुवन (वय -२६ रा.वाक ता.भडगाव) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. संजय त्रिभुवन याच्या विरोधात हद्दपारची कारवाई करावी, यासाठी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रस्ताव तयार केला, हा प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठवला. या प्रस्तावाचे अवलोकन करून स्थानबद्ध करण्याच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी २ डिसेंबर रोजी मंजुरी देत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.