पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे इसमांविरुध्द मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मंजूर केला आहे. प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून चौकशी झाल्यावर त्यांना जळगांव जिल्हयातुन २ वर्षांसाठी हददपार करण्यात येत आहे.
एमआयडीसी पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ प्रमाणे टोळी प्रमुख हितेश संतोष शिंदे (वय २५), संतोष उर्फ जांगो रमेश शिंदे (वय ४५), आकाश उर्फ नागतोड्या संजय मराठे (वय २२), सुमीत उर्फ गोल्या संजय मराठे वय (२७), संजय देवचंद मराठे (वय ५०)सर्व रा. चौगुले प्लॉट, कांचन नगर जळगांव यांचे विरुध्द शनिपेठ पो.स्टे. जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगांव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, दुखापत, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, आदेशाचे उल्लघन या सदराखाली एकुण ०७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत.
सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी डिवायएसपी संदीप गावीत यांनी केलेली आहे. टोळीने राहुन जळगाव शहरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही, असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे.
सदरचा हद्दपार प्रस्ताव हा शनिपेठ पो. स्टे. चे पो. नि. रंगनाथ धारबळे, सफौ/संजय शेलार, पोह/अम्वीन हडपे, परिष जाधव, पोकों/ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकूंदा गंगावणे अशांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती टोळीला ०२ वर्षाकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो.निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.