जळगाव (प्रतिनिधी) :- प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांचं हे जन्मशताब्दी साजरं करताना चांदोरकर प्रतिष्ठानानं विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने “विद्याधर गीतरंग” या वैशिष्ट्यपूर्ण नाट्य गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. हा कार्यक्रम रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता कांताई सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच अशोक जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
रविवारी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी व प्रांत महेश सुधळकर, मेजर वाणी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, उद्योजक किरण बेंडाळे यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना शुभदा दादरकर यांची असून मुंबईचे गायक कलावंत ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, प्राजक्ता जोशी, व निमिष कैकाडी यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. साथ संगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) हे करणार आहेत. विद्याधर गोखले जन्मशताब्दी कृतज्ञता सोहळ्यास जळगावकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व विद्याधर गोखले नाट्यसंगीत प्रतिष्ठानने केली आहे.