रावेर येथे महामार्ग रोखला, वनाधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन
चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचकडून आज गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेर येथे अंकलेश्वर महामार्गावर तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रावेर तालुक्यातील वन विभागात परप्रांतीय मेढपाळ यांना बंदी करण्याबाबत रास्ता रोको आंदोलन तडवी भिल्ल एकता मंच कडून करण्यात आले. आंदोलन ठिकाणी रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी भेट दिली. आंदोलकांच्या मागणी मान्य करून वन क्षेत्राअंतर्गत कोणत्याही प्रकारचे परप्रांतीय मेढपाळ आणि कोणतीही अवैध चराई आढळून आल्यास त्यावर तात्काळ वन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसे लेखी स्वरूपात पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. त्यानंतर आंदोलन तब्बल एक तासांनी मागे घेण्यात आले.
आंदोलनात आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचेराज्य सदस्य नशिर तडवी, जिल्हा अध्यक्ष सलीम तडवी, कार्याध्यक्ष फिरोज तडवी, जिल्हा उपाध्यक्ष सर्फराज तडवी, जिल्हा सचिव जहाँगीर तडवी, तालुका अध्यक्ष सलीम तडवी, प्रसिद्धी प्रमुख अमित तडवी. सचिव जुम्मा तडवी, जाहबीर तडवी, रमा तडवी, लुकमान तडवी, चांदखा तडवी, हमीद तडवी, मैबू हुसेन तडवी, हुसेन तडवी, जाहीर तडवी, रफिक तडवी, महिला जिल्हाध्यक्ष हसीना तडवी, मुन्नाबाई तडवी, सचिव बबिता तडवी, समिना तडवी, जुगरा तडवी, सुगराबाई तडवी, हसनूर तडवी, रेहाना तडवी, जुबेदा तडवी, हजरबाई तडवी, उमर तडवी, रफिक तडवी व मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होते.