राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर गुलाबराव पाटील यांच्याकडील जळगाव व बुलढाणा यापैकी जळगाव कायम असून बुलढाणा दिलीप वळसे पाटलांकडे देण्यात आले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील दुसरे मंत्री अनिल भाईदास पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद लाभले आहे. त्यामुळे विजयकुमार गावितांना भंडारा जिल्हा देण्यात आला आहे.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार