• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

भाजीपाला विकणाऱ्या आजींना ड्रॉ ठरला ‘लकी’ ; जिंकली ईलेक्ट्रिक स्कूटर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2023
in Uncategorized
0
भाजीपाला विकणाऱ्या आजींना ड्रॉ ठरला ‘लकी’ ; जिंकली ईलेक्ट्रिक स्कूटर !


चाळीसगावच्या एकदंत सांस्कृतिक महोत्सवात बक्षिसांची लयलूट

चाळीसगाव (प्रतिनिधी) :– गणेशोत्सव निमित्ताने चाळीसगाव शहरासह तालुकावासीयांना १० दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या आ. मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत या भव्य सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य, गायन, कीर्तन, अध्यात्म, प्रबोधन, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्यात सर्वात मोठे व पहिल्या क्रमांकाचे बक्षीस असणारी इलेक्ट्रिक स्कूटर या बक्षिसाच्या मानकरी चाळीसगाव शहरात अफू गल्ली मध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय मथुराबाई जगन्नाथ गायके या ठरल्या.

विशेष म्हणजे मथुराबाई यांच्या अगोदर दोन महिलांच्या नावाची चिट्ठी काढण्यात आली. मात्र त्या लकी ड्रॉ साठी उपस्थित नसल्याने नियमाप्रमाणे पुढील चिठ्ठी काढली असता त्यात मथुराबाई यांचे नाव निघाले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लकी ड्रॉ चा थरार सुरु होता. अत्यंत गरिबीची परिस्थती असणाऱ्या मथुराबाई गायके यांच्या पायात चप्पल देखील त्यावेळी नव्हती. भाजीपाला विक्री करून त्या आपला उदरनिर्वाह चालवितात, त्यांचा एक नातू एका खाजगी फर्म तर एक नातू नंदन डेअरी वर कामाला आहेत. खऱ्या अर्थाने त्या कष्टकरी आजीला गणपती पावला अशीच भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. आपला दररोजचा संसार प्रपंच सांभाळून स्वतःसाठी वेळ काढणाऱ्या या महिला भाविकांसाठी जवळपास १०० बक्षिसांचा लकी ड्रॉ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यात जवळपास १० हजार महिलांनी आपली नोंदणी केली होती.

आमदार मंगेश चव्हाण, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याहस्ते मथुराबाई गायके यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्यात आली. ७० वर्ष वय असले तरी तरुणांना लाजवेल असा उत्साह मथुरा आजी यांचा होता. माझी तब्बेत अजूनही चांगली आहे, मला या गाडीचा उपयोग नाही, आयुष्यभर मी पायी चालून कष्ट घेत संसार केला तस यापुढेही मी पायीच चालेल… गाडीची चार्जिंग संपेल पण माझ्या पायांची नाही असे आजीनी म्हणताच उपस्थितांनी जोरात टाळ्या वाजवत आजीला दाद दिली.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवात छोटी मोठी जवळपास १०० बक्षिसे देण्यात आली. त्यात १ इलेक्ट्रिक स्कूटर, ५ हिरो सायकल्स, १ एलइडी टीव्ही, ५ मिक्सर, २ गॅस शेगडी, ११ पोळी डबे, १० भिंतीवरील घड्याळे, १० कुकर, १५ कपबशी सेट, ३० पर्स अश्या बक्षिसांचा समावेश होता. शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही बक्षिसे देण्यात आली.


 

 

Tags: #chalisgaongav #aa.mangesh chvan newshttps://kesariraj.com/viknarya-aajina-draw-tharla-laki/
Previous Post

विसर्जनासाठी आलेल्या ओमनी कारने घेतला अचानक पेट

Next Post

धारदार शस्त्राने दोघा भावंडांवर हल्ला करणारे दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धारदार शस्त्राने दोघा भावंडांवर हल्ला करणारे दोघांना अटक

धारदार शस्त्राने दोघा भावंडांवर हल्ला करणारे दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon