पोलीस बांधवांची होणार विविध तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) – येथील पियुष हॉस्पिटल यांच्या सौजन्याने व जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८. ३० वाजता करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आरोग्य तपासणी शिबिरात जनरल बॉडी चेकअप, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर, क्रियाटिनिन, लिपिड प्रोफाइल तपासली जाणार आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस बांधवांची उपस्थिती राहणार आहे. शिबिरात पियुष हॉस्पिटलचे संचालक डॉ. रोहन पाटील, काबरा हॉस्पिटलचे डॉ. प्रफुल्ल काबरा, अवनीश पॅथलॅबचे डॉ. अतुल सोनार यांच्या मार्गदर्शनात निरोगी आरोग्याच्या टिप्स पोलीस बांधवांना दिल्या जाणार आहेत.
पोलिसांनी शिबिराला उपस्थिती द्यावी असे आवाहन निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी केले आहे.