रावेर तालुक्यातील धामोडी येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या धामोडी गांवालगत गुरुवारी २१ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान झालेल्या बस व दुचाकीच्या अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
श्री समर्थ फर्टिलायझर्सचे संचालक बबन पाटील हे धामोडीकडे जात असताना रावेर डेपोच्या एमएच २० बीएल ०९०८ या बसने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. धडकेत बबन पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना त्याला मृत घोषित करण्यात आले.
यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयत बबन पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यानी पोलीसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास निंभोरा पोलीस करीत आहेत.