भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला भुसावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील शिरपूर कानडा रोड परिसरात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीला आरोपी रुपेश मंगल पाटील याने 8 फेब्रुवारी 2019 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पीडित तरुणीला लग्नाच्या आमिष दाखवून तिच्याशी प्रेम संबंध ठेवून तिच्या संमतीविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करून तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या घरच्यांना लोकांना त्रास देईल अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला यामुळे कंटाळून तरुणीने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी रुपेश मंगल पाटील राहणार शिरपूर कन्हाळा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे करीत आहे. दरम्यान आरोपीने पीडित तरुणीला कुरा पानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला.