लासगाव (ता. पाचोरा) – येथून १० कि.मी अंतरावर असलेल्या मोहाडी ता.पाचोरा गावाच्या विकासासाठी उच्च शिक्षित महिला सरपंच होण्याचा मान सौ. ज्योतीताई हेमराज पाटील यांनी मिळविला. सौ. ज्योतीताईनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच पदाचे सूत्र हातात घेतली आणि फक्त अडीच वर्षात विकास कामांचा सपाटा लावला ग्राम विकासासाठी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील व त्यांचे पती सरकारी कंत्राटदार श्री हेमराज पाटील आणि गावकऱ्यांनी भरभरून अशी खंबीर साथ दिली.
ज्योतीताईनी सरपंच पदाचे सूत्र हाती घेतले तेव्हा कोरोन सारख्या महामारीशी सर्व गाव लढत होते आणि त्या संकटाला सामोरे जात त्यांनी गावात जनजागृती केली मास्क लावणे सक्तीचे केले, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्टॆ्टर मशीन उपलब्ध करून दिले, धुरळणी यंत्र आणले गावातील लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ करून दिला. प्राथमिक शाळेला अगोदर मुतारी व शौचालयाचे स्वरूप होते, शाळेकडे वैयक्तिक लक्ष देवून शाळेला वॉल कम्पौंड, हॅन्डवॉश स्टेशन, मुतारी शौचालय व पूर्ण पटांगणास पेवर ब्लॉक बसविले अशा प्रकारे शाळेचा चेहरा बदलवला व त्या बदलामुळे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रफुल्लित चेहरे बघण्याचा समाधान ज्योतीताईना मिळाले. त्यानंतर गावात रस्त्यात गटारी कि गटारीत रस्ते अशी परिस्थिती होती गावात पूर्णपणे काँक्रीटीकरण व चौकाचौकात पेवर ब्लॉक बसविले.व १४,१५ वित्त आयोगातून अंगणवाडी,शौचालय ,मुतारी,गटारी इत्यादी प्रश्न मार्गी लावले. गावात प्रत्येक समजासाठी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून सभा मंडपाचे बांधकाम केले. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ते व गटारींची कामे केली.
घनकचरा व्यवस्थापनाचे काम केले, मागील पाच वर्षापासून गावात बस येत नव्हती बस सेवा चालू केली,सुसज्ज स्मशानभूमी बैठक व्यवस्थेचे काम केले, व्यायमाचे साहित्य उपलब्ध करून दिले.गावात ठिकठिकाणी बैठक व्यवस्था करून दिली.आज सुशोभीकरणाचे काम प्रगतीत आहे. गावाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून ॲक्वा प्लांट बसविला. अशा विविध कल्याणकारी आणि नाविन्यपूर्ण योजना सरपंच पदाच्या अडीच वर्षाच्या काळात राबविल्या ह्या योजना राबवत असताना नाशिक,जळगाव,पुणे यशदा ह्या सर्व ठिकाणी प्रशिक्षणात हिरीरीने भाग घेतला तसेच विविध समस्या,तंटे सोडवण्यासाठी सौ. पाटील ह्या नेहमी प्रयत्नशील असतात.
मोहाडी (ता.पाचोरा) येथील मागासवर्गीय वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन करतांना सरपंच सौ.ज्योती पाटील, हेमराज पाटील आदी.