जळगाव (प्रतिनिधी) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी वरूणराज नन्नवरेची भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आयसीएमआर वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी भारत सरकारची संस्था आहे. दरवर्षी १५०० वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म स्टुडंटशिप कार्यक्रमा अंतर्गत संशोधन करण्याची संधी मिळते.या वर्षी डॉ उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणार्या व महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी वरुणराज नन्नवरे याची या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
सुमारे २०,०००विद्यार्थ्या मधून केवळ १००० एमबीबीएस विद्यार्थी निवडले जातात. यासाठी वरुणराजला फारमॅकोलॉजी विभागाचे प्रा. डॉ राहुल भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.गोदावरी समुहाचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटिल, सचिव डॉ वर्षा पाटिल,संचालिका डॉ केतकी पाटिल, हृदयरोगतज्ञ डॉ वैभव पाटिल,महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ एनएस आर्वीकर, रजिस्ट्रार श्री प्रमोद भिरुड व सर्व प्राध्यापकांकडून वरुणराजचे अभिनंदन करण्यात आले.