जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील छ. शिवाजी नगर येथील खुबचंद सागरमल माध्यमिक विद्यालयात जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, भवरलाल जैन कांताबाई जैन फाउंडेशन व अँड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान यांच्यातर्फे विद्यालयातील ४०० होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी श्याम कोगटा, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सांगोरे, नगरसेवक अँड. दिलीप पोकळे, गणेश सोनवणे नवनाथ दारकुंडे, कुंदन काळे, माजी नगरसेवक राजु मोरे, हर्षा सांगोरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सुभाष सांगोरे यांनी भवरलाल जैन व कांताबाई जैन प्रतिष्ठानच्या वतीने विद्यालयातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश आदिवाल, योगेद्र पवार, राहुल देशमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील संजय पाटील, प्रविण पाटील,संतोष चौधरी, विजय पवार, योगिनी बेंडाळे, कल्पना देवरे, मंगला सपकाळे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत महाजन यांनी केले तर आभार प्रविण पाटील यांनी मानलेत.