भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोंडगाव येथील घडलेल्या घटनेत पीडितांच्या कुटुंबीयांची जिजाऊ ब्रिगेड यांनी भेट घेतली. कुटुंबियांना भेटून त्यांना धीर दिला. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघही उपस्थित होत्या.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा पाटील यांनी स्मिताताई यांच्याशी चर्चा केली. हा खटला फास्टट्रॅक द्वारे चालवण्यात येऊन सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी विनंती जिजाऊ ब्रिगेड तर्फे करण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा पाटील, पुनम पाटील, कल्याणी देवरे, ज्योती पाटील, अर्चना पाटील, मोहिनी पाटील, कोमल चौरे व गावकरी महिलाही उपस्थित होत्या.